घरच्या घरी तवसाचे घारगे किंवा मोठ्या गावठी काकडी चे घारगे बनवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काकडीचे घारगे बनवायची रेसिपी (Kakdiche Gharge Recipe) हवी आहे? या पोस्ट मध्ये तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळेल.
काकडीचे घारगे : Kakdiche Gharge Recipe
कोकणात जसे लाल भोपळ्याचे घारगे करतात तसेच तवसाचे घारगे किंवा मोठ्या गावठी काकडीचे घारगे ही बनवतात.पावसाळ्यात मिळणाऱ्या मोठया गावरान काकड्यांचे घारगे देखील खूप चविष्ट बनतात. चला तर काकडीचे घारगे घराच्या घरी कसे बनवायचे हे पाहूया;
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
किती जणांना पुरेल | २-४ जण |
साहित्य: Ingredients
- गावठी काकड्या: ४-५ नग (साले काढून किसून घेतलेला)
- किसून घेतलेला देशी गुळ (जेवढा काकडीचा कीस शक्यतो तेवढाच गूळ घ्यावा.)
- चवीपुरते मीठ
- गव्हाचे पीठ (काकडी आणि गुळ मिश्रणात सामावेल इतके.)
- १ टीस्पून जीरापुड
People Also Read : ड्रायफ्रूट मोदक रेसिपी- Dryfruit Modak Recipe
कृती: Cooking Instructions
- सर्वप्रथम काकडी स्वछ पाण्याने धुवून घ्यावी.
- आता आणलेल्या काकड्या किसून घ्याव्यात.
- एका ताटात किसलेली काकडी, चवीपुरते मीठ आणि किसलेला गूळ मिक्स करावा.
- आता हे मिश्रण एका पातेल्यात टाकून काकडीचे पाणी सुटेल इतपत गरम करून घ्यावे.
- आता या मिश्रणात लागेल तेवढे गव्हाचे पीठ मिक्स करून पुरीच्या पिठासारखे मळून घ्यावे.
- हवं असल्यास थोडेसे तांदळाचे पीठ टाकू शकता.
- कढईत तेल गरम करा.
- शक्य असल्यास कर्दळी किंवा केळीच्या पानावर तेल लावून, घारगे थापून घ्यावेत.
- थापलेले घारगे हलक्या हाताने गरम तेलात सोडावेत.
- घारगे थोडे जाडसर थापावेत म्हणजे चांगले फुगतात.
काकडीचे घारगे हे पौष्टिक असल्याने लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. तुम्ही ही रेसिपी वापरून घरच्या घरी हा पदार्थ नक्की करून पहा आणि कॉमेंट्स मध्ये आम्हाला ही कळवा.