घरच्या घरी अय्यंगार स्टाईल रवा केक बनवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला अय्यंगार स्टाईल रवा केक रेसिपी (Iyengar Style Rava Cake Recipe) हवी आहे? या पोस्ट मध्ये तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळेल.
अय्यंगार स्टाईल रवा केक रेसिपी (Iyengar Style Rava Cake Recipe)
केक म्हटले की लहान असो की मोठा प्रत्येकाला आवडतो, कोणाला चॉकलेट क्रीम वाला केक आवडतो, तर कोणाला मावा केक आवडतो. काहींना चहा बरोबर रवा केक खायला आवडतो. चला तर आज आपण पाहूया अयंगार स्टाईल रवा केक रेसिपी वापरून घरच्या घरी हा केक कसा बनवायचा.
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for the Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | ५०-६० मिनिटे |
किती जणांना पुरेल | ३-४ जण |
साहित्य : Ingredients
अय्यंगार स्टाईल रवा केक (Iyengar Style Rava Cake) साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे;
- 2 वाटी बारीक रवा
- 1 वाटी पिठी साखर
- 1 वाटी दुध
- 1 वाटी ताजे दही
- 1 चमचा वॅनिला इसेन्स
- 1 चमचा बेकिंग पावडर
- 1 चमचा बेकिंग सोडा
- 1/4 वाटी तेल
- चवीपुरते मीठ
कृती: Cooking Instructions
- एका बाउल मध्ये दही फेटून घ्या.
- आत त्यात दूध, पिठी साखर आणि वॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करून घयावे.
- वरील मिश्रणात रवा घालावा आणि चांगल्या प्रकारे मिक्स करावे .
- बाउल झाकून हे मिश्रण १५-२० मिनिटे तसेच ठेवून द्यावे.
- आता बाउल मधल्या मिश्रणात, हवे तेवढ्या प्रमाणात दूध घालून केकचे बॅटर बनवून घ्यावे.
- बॅटर मध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून ते नीट मिक्स करून घ्यावे.
- केकपात्राच्या तळाशी तेल लावून ग्रीसिंग करून घ्यावे.
- केकपात्राच्या तळाशी हवे असल्यास सुका मेवा किंवा टुटी फ्रुटी टाकावी.
- त्यावर आपण बनवलेले बॅटर अलगद ओतून घ्यावे.
- कुकर मध्ये केक भाजायचा असल्यास सर्वप्रथम कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यावी.
- कुकर मध्ये तळाशी १ वाटी मीठ टाकून, त्यातील स्टॅन्ड मध्ये केकपात्र ठेवावे.
- आता कुकरचे झाकण लावून मंद आचे वर ३०-४० मिनिटे केक भाजण्यास ठेवावे.
- घरात OTG असल्यास १८० डिग्री वर २०-२५ मिनिटे केक भाजण्यास ठेवा.
- केक शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी, केकच्या आतमध्ये टूथपिक टाकून तपासून पाहा.
टिप्स : Useful Tips
- बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नको असल्यास तुम्ही ENO वापरू शकता.
- टूटीफ्रूटी आवडत नसल्यास सुकामेवा घालू शकता.
- केक कुकर मध्ये भिजणार असल्यास नेहमी मंद आचेवर भाजावा.
- व्हॅनिला इसेन्स ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे इतर इसेन्स हि वापरू शकता.
रव्याचा केक हा पौष्टिक असल्याने लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. तुम्हीही
अय्यंगार स्टाईल रवा केक रेसिपी (Iyengar Style Rava Cake Recipe) वापरून घरच्या घरी हा पदार्थ नक्की करून पहा आणि कॉमेंट्स मध्ये आम्हाला ही कळवा.
Definitely will try this at home
Easy and simple recipe , Will try it definitely
Very interesting details you have mentioned,
thank you for posting.Blog monry