कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी – Bombil Rava Fry recipe

कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी – Bombil Rava Fry recipe

कुरकुरीत बोंबील फ्राय (Bombil Fry) म्हटले कि सर्व मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. एकतर बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि वर्षाचे जवळ जवळ १२ महिने ओले बोंबील उपलब्ध असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जिथे मांसाहार केला जातो तेथे बोंबील फ्राय ही डिश हमखास बनवलीच जाते. चला तर कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे याची रेसिपी (Bombil Rava Fry recipe) पाहूया.

Bombil Rava Fry recipe
Bombil Fry

रेसिपी साठी लागणारा वेळ :- Time Required for Recipe

पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ३० मिनिटे
पाककृती शिजवण्यासाठी वेळ२० मिनिटे
किती जणांना पुरेल२-४

साहित्य : Ingredients

बोंबील फ्राय रेसिपी (Bombil Fry Recipe) साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे

 • ५-६ मोठ्या आकाराचे ओले बोंबील
 • १ टीस्पून हळद
 • १ लिंबाचा रस
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • ८-१० लसणीच्या पाकळ्या
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • तळायला तेल
 • २-३ कप रवा
 • १ कप तांदळाचे पीठ ( तांदळाच्या पीठाने बोंबील अजून कुरकुरीत होतात )
 • ४ चमचे घरचा मसाला
 • चवीपुरते मीठ
Ole Bombil
Ole Bombil
Rava-Masala-Mixture
Rava-Masala-Mixture

People Also Read : पौष्टीक पाया सूप रेसीपी

कृती: Cooking Instructions

 • सर्वप्रथम बाजारातून ओले बोंबील (Bombay Duck) आणताना ते मासे विक्रेत्या कडूनच व्यवस्थित कापून घ्यावेत.
 • मासे विक्रेत्या कडूनच बोंबलाच्या पोटाच्या मध्यभागी चीर देऊन साफ करून घ्यावेत.
 • बाजारातून ओले बोंबील घेऊन घरी आल्यावर बोंबील स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.
 • एका कोरड्या फडक्याने बोंबील कोरडे करून घ्यावेत.
 • आता बोंबलांना हळद, मीठ, लिंबाचा किंवा कोकमाचा रस चोळून घ्यावा आणि १५ मिनिट मुरत ठेवावेत.
 • आता या बोंबलामधील असलेले पाणी काढण्यासाठी एका कपड्यात सर्व बोंबील घ्यावेत आणि त्यावर १५-२० मिनिटे, एखादी वजनदार वस्तू / पाटा ठेवावा, जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल.
 • मिक्सर मध्ये आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून थोडासा जाडसर मसाला वाटून घ्यावा. आता हे मिश्रण बोंबलांना नीट लावून घ्यावे.
 • एका प्लेट मध्ये रवा, लाल मसाला, तांदळाचे पीठ आणि चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.
 • तव्यावर ३-४ चमचे तेल टाकून तेल गरम करून घ्यावे.
 • तेल चांगले तापवून घ्यावे, नाहीतर तळताना बोंबील तुटू शकतात.
 • तेल चांगले तापल्यावर हिरवा मसाला लावलेले बोंबील, रवा-मसाला मिश्रणात चांगले घोळवून तव्यावर तळण्यास सोडावेत.
 • बोंबील दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावेत.
 • एका प्लेट मध्ये टिशू पेपर ठेवून त्यावर हे तळलेलं बोंबील ठेवावेत म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
 • आता सर्विंग प्लेट मध्ये कुरकुरता तळलेले बोंबील गरमागरम सर्वाना सर्व्ह करावेत.
Bombil with Rava-masala
Bombil with Rava-masala
Bombil on tava
Bombil on tava
Rava Masala Bombil Fry
Rava Masala Bombil Fry

कुरकुरीत बोंबील फ्राय हे घरातच नव्हे तर हॉटेल मध्ये ही खूप प्रसिद्ध आहेत. कोणत्याही मांसाहारी हॉटेल मध्ये ही डिश तुम्हाला मिळणारच.. तर नक्की करून पहा कुरकुरीत बोंबील राव फ्राय रेसिपी (Bombil Rava Fry recipe) आणि कशी झाली हे ही नक्की कंमेंट करून सांगा.

1 thought on “कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी – Bombil Rava Fry recipe”

Leave a comment