कुरकुरीत खमंग कांदा भजी रेसिपी – Delicious kanda bhaji recipe

खमंग कांदा भजी – Delicious kanda bhaji recipe

बाहेर धोधो पाऊस पडतोय आणि त्याच वेळेस तुम्हाला कुणी चहा आणि कांदाभजी आणून दिली तर? नुसत्या कल्पनेने तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल ना? चला तर मग खमंग कांदाभजी कशी बनवायची (kanda bhaji recipe) या बद्दल आपण माहिती घेऊया.

Kanda Bhaji Recipe

खमंग कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients

  • उभा चिरलेला कांदा
  • १/२ चमचा मीठ
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • बेसन
  • तांदळाचं पीठ
  • १/४ चमचा हळद
  • लाल तिखट
  • ओवा
  • थोडंसं मीठ
  • चिमूटभर सोडा
  • तळण्यासाठी तेल

कृती – Cooking Instructions

• कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा.
• त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन १० मिनीटे बाजुला ठेवावे.
• १० मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल.
• त्यात भिजेल इतपत पीठ घालावे, पाणी अजीबात घालु नये.
• कोथींबीर घालुन त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे.
• नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.
• भजी मध्यम आचेवर तळून घ्या नाहीतर सारखी तळणार नाहीत.
• तळलेल्या खारट हिरव्या मिरच्या, पुदिन्याची चटणी किंवा पुदिना कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर कांदा भजी सर्व्ह करा .

People Also Read:- चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी- Chana Koliwada recipe

Leave a comment