पावसाळ्यात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. पाऊस धोधो पडत असताना बाहेर पडणे जमत नाही आणि चटपटीत खायची इच्छा पण अनावर होते. तुम्ही हॉटेल्स किंवा धाब्यावर बऱ्याच वेळेस चणा कोळीवाडा खाल्लाच असेल. सर्वाना आवडेल अशी हि चटपटीत कुरकुरीत चणा कोळीवाडा रेसिपी (Chana Koliwada recipe) घरच्या घरी करता आली तर …. चला तर आज आपण पाहूया कि खमंग आणि कुरकरीत चणा कोळीवाडा हि रेसिपी कशी बनवायची.
चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी – Chana Koliwada recipe
साहित्य – Ingredients
१. काबूली चणा
२. लसूण
३. हळद
४. मिरची पावडर
५. तेल
६. गरम मसाला
७. रेड सॉस , ग्रीन सॉस,
८. कॉर्नफ्लॉवर
९. चवीनुसार मीठ
१०. लिंबाचा रस
११. चाट मसाला
कृती – Cooking Instructions
1. सर्व प्रथम आदल्या दिवशी २ वाट्या काबुली चणे भिजत घालावेत.
2. दुसऱ्या दिवशी, भिजलेले चणे कुकर मध्ये शिजवून घ्या.
3. शिजवताना त्यात चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका.
4. एकीकडे कुकर मध्ये चणे शिजत असताना, दुसरीकडे चणे तळण्यासाठी बॅटर बनवून घ्यावे. कॉर्नफ्लॉवर, रेड सॉस, ग्रीन सॉस, मिरची पावडर, थोडीशी हळद आणि गरम मसाला हे सर्व एकत्र करून चणे तळण्यासाठी बॅटर बनवून घ्या.
5. शिजलेले चणे कुकर मधून एका बाउल मध्ये काढून घ्या आणि त्यातील पाणी निथळून जाईल हे पहा.
6. पाणी निथळून झाल्यावर , चणे गरम असताना त्यावर फ्रिज मधील थंड पाणी ओतावे. या थंड पाण्याने चणे अजून कुरकुरीत होतात.
7. आता चणे पाण्यातून बाहेर काढावेत आणि बनवलेल्या बॅटर मध्ये टाकावेत.
8. कढईत तेल गरम करावे आणि उकळत्या तेलात बॅटर मध्ये घोळवलेले चणे तळून घ्यावेत.
9.एका छोट्या कढईत १०-१२ लसणाच्या पाकळ्या (सालांसहित) तळून घ्या.
10.एका डिश मध्ये तळलेले चणे ठेवून त्यावर लसणाच्या पाकळ्या पसरवा.
11.आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस टाकून चाट मसाला भुरभुरावा.
People Also Read :- खमंग कांदा भजी – Delicious kanda bhaji recipe
Yummy receipe