पावसाळ्यात भजी खायची मजाच काही और असते. चला तर झटपट घरच्या घरी ओल्या जवळ्याची खमंग भजी (Tasty Jawla Bhaji) कशी बनवायची ते पाहूया. जवळा म्हणजे अतिशय बारीक कोळंबी (Tiny Prawns/ Baby Shrimp). ओल्या जवळ्याची भजी खूपच चविष्ट लागते आणि झटपट घरच्या घरी बनवता येते.
ओल्या जवळ्याची भजी रेसिपी साठी लागणारा वेळ :- Time Required for Jawla Bhaji Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी वेळ | १०-१५ मिनिटे |
किती जणांना पुरेल | ३-४ जण |
साहित्य:- Ingredients
१ कप चांगला धुतलेला जवळा
१ बारीक चिरलेला कांदा
1 कप बेसन
१/२ कप तांदळाचे पीठ
1 टीस्पून बारीक कापलेली हिरवी मिरची
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ चमचा धने पावडर
1/2 टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून लाल तिखट मसाला
चवीनुसार मीठ
१/२ वाटी कोथिंबीरीची पाने
आवश्यकतेनुसार पाणी
तळण्यासाठी तेल
People Also Read :- चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी
कृती :- Cooking Instructions
1.एका भांड्यात ओला जवळा, कांदा, बेसन,तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आले-लसूण, हळद, मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.
2.जवळा धुतलेला असल्याने, शक्यतो अजून पाणी न घालता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
3.आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
4.एका कढईत तेल गरम करून घयावे .
5.आता तापलेल्या तेलात हे गोळे /भजी तळून घ्यावेत.
6.गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे गोळे तळून घ्या.
7.एका प्लेट मध्ये टिशू पेपर ठेवून त्यात हि भजी काढून घ्या.
8.घरच्या घरी झटपट बनवलेली गरमा-गरम जवळ्याची भजी (Tasty Jawla Bhaji) सर्वाना खायला द्या.
9.ओला जवळा नसल्यास, वरील रेसिपी तुम्ही सुका जवळा वापरूनही करू शकता.