लेह-लडाख टूर चे प्लॅनिंग आणि अंदाजे खर्च : Planning Leh-Ladakh trip

लेह-लडाख ला कधी जायचं, कसं जायचं, राहायचं कुठे, खायला काय मिळेल, ट्रिपचा खर्च ? (Leh-Ladakh Trip planning in Marathi)

जरा थांबा … किती ते प्रश्न … तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील…

लेह-लडाख टूर चे प्लॅनिंग : Leh-Ladakh Trip planning

भारतातील लेह लडाख म्हणजे निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेला हिमालयातील सुंदर प्रदेश. लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे, जो उत्तरेकडील काराकोरम पर्वत आणि दक्षिणेकडील हिमालय पर्वतांच्या दरम्यान आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, तसेच उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे. लेह हि लडाख ची राजधानी असून लडाख ची लोकसंख्या अंदाजे ३ लाख आहे.
लेह-लडाख या सर्वांग सुंदर प्रदेशाचे सर्वानाच खूप आकर्षण आहे. भारतातील पर्यटक तर तिथे जातातच पण परदेशातील पर्यटकांना सुद्धा लेह-लडाख चे आकर्षण आहे. जर तुम्हाला नदी,दरी, पर्वत,बर्फ, निळे आकाश आणि मुख्यतः प्रदूषण मुक्त प्रदेश पाहावयाचा असेल तर मात्र तुम्हाला लेह-लडाख ला जावेच लागेल. जमिनी पासून खूप उंचावर असल्याने तिथे oxygen चे प्रमाण कमी आहे. तेवढी एक काळजी घेतली, तर तुमची ट्रिप नक्कीच छान होईल आणि तुम्ही निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेऊ शकाल. येथे वाहणारी सिंधू नदी लडाखचा जीव आहे.

लेह-लडाख ला जायचंय

कसे जायचे (How to Reach Leh)

लेह ला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत . एक म्हणजे श्रीनगर -कारगिल लेह आणि दुसरा मनाली – सर्चू – लेह . तुम्ही लेह ला विमानाने हि जाऊ शकता. भारतातील काही ठिकाणावरून लेह साठी डायरेक्ट फ्लाईट्स आहेत, जसे मुंबई, दिल्ली, चंदीगड इत्यादी. तुम्हाला ट्रेन जायचं असेल तर जम्मू किंवा चंदीगड पर्यंत येऊन, मग पुढे गाडीचा प्रवास करावा लागेल. अति उंचावर असल्याने बरेचसे पर्यटक श्रीनगर पर्यंत येतात आणि मग तेथून कारगिल मार्गे लेह ला पोचतात. लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग ३००० मीटर (९८०० फूट) पेक्षा जास्त आहे. अतिउंचावर oxygen कमी असल्याने होणारा त्रास (AMS- Accute Mountain Sickness) श्रीनगर-कारगिल-लेह मार्गे गेलात तर हा त्रास कमी होतो. तुम्ही कारने किंवा बाईकने हा अविस्मरणीय प्रवास करू शकता.

कधी जायचे (Best Season for Leh-Ladakh Trip)

लडाख ला जायचे असेल तर शक्यतो जून ते सप्टेंबर हा काळ निवडावा . भारतात इतरत्र जरी मौसमी पावसाचे वातावरण असले तरी लडाख मध्ये मात्र हा उन्हाळी हंगाम असतो. BRO (Border Road Organisation) च्या अथक प्रयत्नाने, एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या १५-२० तारखे पर्यंत रस्त्यावर साठलेला बर्फ काढला जातो आणि त्यानंतरच श्रीनगर ते लेह चा मार्ग सर्वांसाठी सुरु होतो. काही उत्साही पर्यटक हिवाळी हंगामात मुख्यतः तेथील कडाक्याच्या थंडीतही (-५ ते -५५ डिग्री सेल्सिअस) पर्यटन किंवा चद्दरट्रेक ट्रेकिंग करतात. सामान्य पर्यटकांसाठी मात्र जुन ते सप्टेंबर कालावधीचा चांगला मानला जातो.

कुठे राहायचे (Where to Stay in Leh-Ladakh)

 लेह ही लडाखची राजधानी असल्याने येथे पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. लेह मध्ये राहायला, होमस्टे पासून फाईव्ह स्टार हॉटेल्स पर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. लडाख फिरायला आलेला पर्यटक शक्यतो लेह मधेच थांबून जवळपास ची ठिकाणे पाहून घेतो. लेह मध्ये तुम्हाला बँक, इंटरनेट कनेक्शन, हॉटेल्स, मनी एक्सचेंज, सिम कार्डस इत्यादी सर्व काही मिळेल.

काय खायचे (Delecious Food in Leh-Ladakh)

लडाख मध्ये परदेशी पर्यटक नेहमी येत असल्याने लेह शहरात तुम्हाला भारतीय पदार्थ,बेकरी प्रॉडक्ट्स, पिझ्झा, शाकाहारी-मांसाहारी पदार्थ खायला मिळतील. लडाख मध्ये जाऊन तिथल्या लडाखी पदार्थांचा जरूर आस्वाद घ्यावा. तिथले मोमो , थुपका, स्क्यू , बटर टी, ऍप्रिकॉट जॅम हे लडाखी पदार्थ खूप चविष्ट असून पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत.

काय पाहायचे (Places to visit in Leh-Ladakh trip)

लडाख मध्ये निसर्गाने सौंदर्याची लयलूट केली असल्याने, पर्यटकांना काय आणि किती पाहू असे होते. तुमच्या फोन/कॅमेरा ची मेमरी फुल्ल होईल, इतके फोटो लडाखच्या ट्रिप मध्ये पर्यटकांकडून काढले जातात.

लडाख मधील काही प्रेक्षणीय स्थळे

१. शांती स्तूप
२. पॅंगॉन्ग लेक
३. लेह पॅलेस
४. नुब्रा व्हॅली
५. मॅग्नेटिक हिल
६. मॉनेस्ट्री
७. झंस्कार व्हॅली
८. कारगिल युद्ध स्मारक
९. त्सो कार
१०. त्सो मोरिरी
११.लेह मार्केट
१२. खारडुंगला पास
१३. चद्दर ट्रेक

Pangong-Tso

किती दिवस (Days required for Leh-Ladakh trip)

लडाख एवढे सुंदर आणि शांत आहे कि तिथे गेल्यावर परत यायला तुमचा पाय निघणार नाही. परदेशी पर्यटक तिथेच २-३ महिने राहतात. भारतीय पर्यटक ७-१० दिवसाची लेह-लडाख ट्रिप करतात. काही जण श्रीनगर- कारगिल मार्गे लेह ला जातात आणि येताना लेह वरून सर्चू मार्गे मनालीला उतरतात.

अंदाजे खर्च (Estimated cost for Leh-ladakh Trip)

लडाख मध्ये कारने फिरण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. काही वेळेस भौगोलिक परिस्थिती आणि निसर्गाचे रौद्र रूप यामुळे २०० किमी साठी तुम्हाला ७-८ तास ही लागू शकतात. श्रीनगर-लेह-श्रीनगर या ८ दिवसाच्या बजेट ट्रिपला प्रत्येकी १५-२० हजार लागू शकतात. श्रीनगर येथे पोहोचण्याचा विमान किंवा ट्रेन चा खर्च अतिरिक्त पकडावा.

6 thoughts on “लेह-लडाख टूर चे प्लॅनिंग आणि अंदाजे खर्च : Planning Leh-Ladakh trip”

  1. खुप छान माहिती दिली आम्हाला सगळ्यांना खूप आवडली खुप छान

    Reply

Leave a comment