घरच्या घरी कच्छी दाबेली बनवायची आहे आणि त्या साठी स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली रेसिपी हवी आहे (Street style Kacchi Dabeli Recipe)? तर या पोस्ट मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. संध्याकाळी फेरफटका मारायला घराबाहेर पडलात, तर तुम्हाला एका छोट्याश्या ठेल्यावर पावामध्ये आंबटगोड सारण भरून त्याला बारीक शेव आणि डाळींबाचे दाणे लावून ठेवलेली स्वादिष्ट कच्छी दाबेली दिसतेच. तुम्ही ऑर्डर दिल्यावर विक्रेता तव्यावर बटर लावून ते पाव गरम करून, एका डिश मध्ये मसाला शेंगदाणे आणि दाबेली आपल्याला देतो. नुसतं वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटलं ना ? चलातर पाहूया चमचमीत आणि चटपटीत स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली कशी बनवायची (Street syle Kacchi Dabeli Recipe).
स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली रेसिपी:Street style Kacchi Dabeli Recipe
ठाणे-मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये सर्वात जास्त फेमस असणाऱ्या वडापाव नंतर कच्छी दाबेली चा नंबर लागतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. स्वस्त आणि मस्त अशी कच्छीदाबेली सर्वत्र मिळते. नावामध्ये असणाऱ्या कच्छ या शब्दावरूनच आपल्याला कळते कि या पदार्थाचा उगम गुजरात मधील कच्छ येथे झाला आहे, आणि पावामध्ये आंबटगोड सारण भरून ते दाबले जाते म्हणून या पदार्थाचे नाव आहे कच्छी दाबेली. चलातर पाहूया चमचमीत आणि चटपटीत स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली कशी बनवायची (Street syle Kacchi Dabeli Recipe)?
People Also Read : कुरकुरीत खमंग कांदा भजी रेसिपी
रेसिपी बनवण्यास लागणार वेळ : Time required for the Recipe
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी/बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५-२० मिनिटे |
किती जणांना पुरेल | ३-४ जण |
साहित्य : Ingredients
स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली (Street syle Kacchi Dabeli Recipe) साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे;
- १ लादी पाव ( एका लादी मध्ये शक्यतो ६ पाव असतात)
- २-३ उकडलेले बटाटे
- ३-४ चमचे दाबेली मसाला
- १ टीस्पून तेल
- १/२ टीस्पून हळद आणि हिंग,
- १ टीस्पून जिरे,
- १ टीस्पून चिंचेचा कोळ
- १ टीस्पून कोथिंबीर
- १ वाटी डाळिंबाचे दाणे
- १ टीस्पून किसलेले ओले खोबरे
- १ वाटी चिंचेची गोड चटणी
- १ टीस्पून हिरवी चटणी
- १ वाटी बारीक चिरलेला कांदा
- बटर
- चवीपुरते मीठ
- १ वाटी मसाला शेंगदाणे
- झिरो नंबर बारीक शेव
People Also Read: चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी
कृती: Cooking Instructions
- एका पॅन मध्ये तेल टाकावे.
- तेल गरम झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे,जिरे हिंग, हळद आणि दाबेली मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे.
- यामध्ये चिंचेचा कोळ, चवीपुरते मीठ, पाणी घालून मिश्रण थोडेसे सैलसर बनवावे.
- गॅस बंद करून हे मिश्रण एका ताटामध्ये काढून पसरवावे.
- आता या मिश्रणावर डाळिंबाचे दाणे (Pomegranate), किसलेले खोबरे आणि कोथिंबीर पसरवावी
- आता बेकारी मधून आणलेले पाव मधोमध कापून त्यात चिंचेची चटणी आणि वरील मिश्रण भरून घ्यावे.
- आता यामध्ये मसाला शेंगदाणे, थोडासा कच्चा कांदा आणि हवी असल्यास तिखटगोड चटणी भरून घ्यावी.
- आता पॅनवर एक चमचा बटर सोडावे.
- बटर वितळले कि त्यावर कच्छी दाबेली खरपूस भाजून घ्यावी.
- दाबेलीच्या कडांवर बारीक शेव भुरभुरावी.
- एका छोट्या प्लेट मध्ये बारीक शेव,मसाला शेंगदाणे, कच्चा कांदा सहित गरमागरम कच्छी दाबेली सर्व करावी.
आंबट गोड चवीमुळे, चमचमीत आणि चटपटीत कच्छी दाबेली सर्वाना खूप आवडते, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. तुम्हीही स्ट्रीट स्टाईल कच्छी दाबेली रेसिपी (Street syle Kacchi Dabeli Recipe) वापरून घरच्या घरी हा पदार्थ नक्की करून पहा आणि कॉमेंट्स मध्ये आम्हाला ही कळवा.