पौष्टिक आणि स्वादिष्ट पाया सूप : Healthy and Deliciuos Paya Soup
पाया सूप म्हटले कि लगेच लोकांना बोकडाचे भाजलेले पाय आणि त्याचे बनवलेले पाया सूप (Paya Soup) आठवते. पावसाळ्यात गरमागरम पाया सूप खायला सर्व मांसाहारी लोकांना खूपच आवडतं. पाया सूप खूप पौष्टिक आहे, रुग्णाची शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टर रुग्णाला मटण पाया सूप घ्यायचा सल्ला देतात. चला तर मग पाहूया पौष्टिक आणि रुचकर पाया सूप (Healthy and Deliciuos Paya Soup Recipe) कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया..
पाककृती तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
पाककृती शिजवण्यासाठी वेळ | ३० मिनिटे |
किती जणांना पुरेल | ३-४ जण |
साहित्य : Ingredients
- बोकडाच्या पायाचे भाजून साफ केलेले तुकडे (१०-२० तुकडे)
- २ मध्यम आकाराचे कांदे
- १ लसुणाचा कांदा
- १/४ चमचा हिंग
- १ चमचा हळद
- ८-१० काळी मिरी
- ५-६ दालचीनीचे छोटे तुकडे
- ३-४ तमालपत्र
- चवीनुसार मिठ
- २ मोठे चमचे तेल
- गरजेनुसार पाणी
- (पाया सूप तिखट हवे असल्यास मसाला किंवा हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट)
People Also Read:- ओल्या जवळ्याची खमंग भजी
कृती :- Cooking Instructions
- सर्व प्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा.
- लसणाच्या पाकळ्या सोलून त्या ठेचून घ्याव्यात.
- कुकर मध्ये तेल चांगले गरम करून घ्या.
- तेल गरम झाल्यावर त्यात गरम मसाले आणि लसूण टाकून त्याची फोडणी द्या.
- आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होई पर्यंत परतवा.
- कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हिंग, हळद व जर घरात सर्वाना तिखट आवडत असेल तर मसाला किंवा मिरची कोथिंबीर पेस्ट टाका.
- हे सगळे मिश्रण व्यवस्थित परतवा आणि आता त्यात बोकडाच्या पायाचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि प्रमाणात पाणी टाकून कुकर बंद करून घ्यावा.
- बोकडाचे पाया शिजायला वेळ लागत असल्याने, सर्वप्रथम मोठ्या आचेवर कुकरच्या ४-५ शिट्ट्या घ्या आणि मग मंद आचेवर २०-२५ मिनिटे शिजवत ठेवा.
- आता हे पौष्टिक आणि चविष्ट असेलेले गरमगरम सूप सर्वाना द्या.
पाया सूप चे फायदे
- नियमितपणे पाया सूपचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
- पाया सूप हे अधिक पोषक घटक व कमी कॅलरीयुक्त अन्न आहे.
- पाया सूप पिल्यामुळे पोट भरते आणि त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
- पायासूप शरीरातील पाण्याची कमतरता भागवते आणि यातून फायबर घटक ही मिळतात.
- पाया सूपमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
- पाया सूपचे सेवन केल्याने त्वचेला आणि केसांना फायदा होतो.
- पाया सूपमध्ये असणाऱ्या कॅल्शिअम घटकामुळे नखे व केस अधिक मजबूत होतात.
- पाय सूपमध्ये असलेल्या जिलेटिन मुळे आहारातील पोषक तत्वांचे चांगल्या रीतीने पचन होते, त्यामुळे गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या असतील तर आहारासोबत पाया सूप नक्की घेऊन पहा.
- पाया सूपचे सेवन केल्याने विविध प्रकारचे आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.
People Also Read :- चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी
नेहमी विचारले जाणारे प्रश्न : FAQ
- पाया सूप कशापासून बनवले जाते ?
उत्तर:- पाया सूप शक्यतो बोकडाच्या पायाच्या तुकड्या पासून बनवले जाते. काही वेळेस कोंबडीच्या पायाच्या तुकड्यांचाही वापर केला जातो. - रोज पाय सूप घेऊ शकतो का?
उत्तर: पाया सूप चे अनेक फायदे आहेत, पाया सूप मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, तांबे, बोरॉन, मॅंगनीज आणि इतर विविध खनिजे असल्याने हे सूप नियमित सेवन केल्यास आपल्या शरीराची हाडे मजबूत होतात.