१० दिवसाची लेह लडाख टूर चे प्लॅनिंग कसे करावे ?

लेह लडाख टूर करण्यासाठी जुन ते सप्टेंबर काळ हा उत्तम मानला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत BRO (Border Road Organisation) कडून रस्त्यावरील बर्फ पूर्णतः काढून  लेह मार्ग खुला केला जातो. चला तर मग आपण १० दिवसाची लेह लडाख टूर साठी प्लांनिंग (10 days Leh Ladakh tour planning) कशी करू शकतो हे आता पाहूया.

१० दिवसाची लेह लडाख टूर चे प्लॅनिंग कसे करावे ?- 10 days itinerary for Leh-Ladakh tour

लेह लडाख टूर करण्यासाठी जुन ते सप्टेंबर काळ हा उत्तम मानला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत BRO (Border Road Organisation) कडून अथक प्रयत्नाने रस्त्यावरील बर्फ पूर्णतः काढून श्रीनगर लेह मार्ग खुला केला जातो. त्या नन्तर लेहला जाण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरु होते. लेहला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीनगर-कारगिल-लेह आणि दुसरा मार्ग म्हणजे मनाली-सर्चू-लेह . शक्यतो पर्यटक पहिल्या मार्गाचा वापर करून लेह ला पोहचतात. या मार्गाचा एक फायदा म्हणजे Acute Mountain Sickness (AMS) चा त्रास कमी होतो. कारण तुम्ही हळू हळू उंचावर पोचत असता,त्यामुळे शरीराला कमी Oxygen वापरायची सवय होते. काही पर्यटक दिल्ली किंवा मुंबई वरून विमानाने लेह ला पोचतात. जर तुम्ही डायरेक्ट विमानाने लेह ला पोचत असाल, तर शक्यतो १-२ दिवस लेह मध्ये विश्रांती घ्यावी,जेणे करून शरीराला कमी oxygen वापरण्याची सवय होईल. पर्यटकांनी AMS चा विचार करूनच पुढे जावे. पहिल्या १-२ दिवसात जास्त हालचाल न करता, जास्त Energy न वापरता शरीराला सवय होऊन द्यावी अन्यथा तुमच्या जीवावर हि बेतू शकते. तसेच १० दिवसाची हि लेह लडाख टूर, शक्यतो धावपळीची न करता थोड्या आरामात करावी जेणे करून आपल्याला आणि इतरांनाही त्रास होणार नाही. लेह लडाख बद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करावे 

लेह लडाख टूर कारगिल मार्गे (Leh-Ladakh Tour Itinerary via Kargil)

वर म्हटल्या प्रमाणे लेहला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीनगर-कारगिल-लेह आणि दुसरा मार्ग म्हणजे मनाली-सर्चू-लेह . आपण पहिल्या मार्गे जाण्याचे ठरवल्यास कश्या प्रकारे १० दिवसाची लेहलडाख टूर करता येईल हे पाहूया. सर्वात प्रथम तुम्ही आपल्या घरून ट्रेन किंवा विमानाचा प्रवास करून श्रीनगर गाठावे. आणि त्या दिवशी श्रीनगर ला रात्री हॉटेल मध्ये आराम करावा.

श्रीनगर-कारगिल-झंस्कार व्हॅली-कारगिल-लेह (Srinagar-Kargil-Zanskar valley-Kargil-Leh)

पहिला दिवस – श्रीनगर- कारगिल (Srinagar to Kargil)

श्रीनगर वरून सकाळी लवकर निघाल्यास कुप्रसिद्ध असलेला झोझीला पास मार्गे तुम्ही कारगिल येथे दुपारी १२ पर्यंत पोहचाल.
कारगिल येथे पोचल्यावर त्या दिवशी हॉटेल मध्ये आपले सामान ठेवावे आणि तडक टॅक्सी स्टॅन्ड वर जावे.
टॅक्सी स्टॅन्ड वरून घासाघीस करून झंस्कार व्हॅली साठी टॅक्सी ठरवावी . कारगिल येथून तिथल्याच टॅक्सी झंस्कार व्हॅली येथे जातात.
रात्री कारगिल च्या हॉटेल मध्ये जेवण करून लवकर झोपावे.

Leh Ladakh Tour Planning
Zojila Pass

 

दुसरा आणि तिसरा दिवस – कारगिल – झंस्कार व्हॅली -कारगिल

सकाळी लवकर उठून झंस्कार व्हॅली येथे प्रयाण करावे. कारगिल ते रांगदूम १३० किमी असले तरी रस्ता ओबडधोबड असल्याने तुम्हाला पोचायला दुपार होऊ शकते. रंगदूम येथे काही होमस्टे आहेत तिथे अगोदर बुकिंग करून ठेवावे जेणे करून तुम्हाला त्या राती तिथे राहता येईल.
आकाश निरभ्र असल्यास तुम्ही त्याच दिवशी ड्रंगडुंग ग्लेशियर पाहायला जाऊ शकता .
जर तुम्हाला झंस्कार नदी पर्यंत किंवा जेथून चद्दर ट्रेक चालु होतो तिथे जायचे असेल, तर अजून ५-६ तास प्रवास करावा लागेल.
तुमच्या कडे जर झंस्कार व्हॅली साठी दोनच दिवस असतील, तर ड्रंगडुंग ग्लेशियर बघून रंगदूम वरून परत फिरावे आणि कारगिल गाठावे.
कारगिल ला आल्यावर त्या दिवशी रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी लेह साठी प्रयाण करावे

Leh Ladakh Tour Planning

Drang Drung Glasier

Zanskar river

चौथा दिवस – कारगिल-लेह

कारगिल वरून सकाळी लवकर निघाल्यास तुम्ही वाटेत येणारे कारगिल युद्ध स्मारक, मॅग्नेटिक हिल, गुरूद्वारा बघून लेह गाठू शकता.
लेह ला संध्याकाळी पोचल्यावर रात्री हॉटेल वर विश्रांती घ्यावी.

Leh Ladakh Tour Planning
Kargil-War-Memorial

 

Leh Ladakh Tour Planning
Magnetic Hill

 

पाचवा दिवस – लेह मधील प्रेक्षणीय स्थळे (Attractions in Leh)

दुसऱ्या दिवशी लेह मधील प्रेक्षणीय स्थळे पाहावीत उदा. लेह पॅलेस , शांती स्तुपा , लेह मार्केट, लेह मधली शाळा इत्यादी.
पुढील दिवशी लेह मधून लवकर निघून पॅंगॉन्ग त्सो साठी प्रयाण करावे.

Leh Ladakh Tour Planning
Shanti Stupa

 

Leh Ladakh tour

सहावा दिवस – लेह – पॅंगॉन्ग- लेह

लेह ते पॅंगॉन्ग २३० किमी असून तेथे पोहचायला ६-७ तास लागू शकतात. शक्य असल्यास तेथील हॉटेल किंवा टेन्ट अगोदरच बुक करावे.
रात्री पॅंगॉन्ग त्सो च्या टेन्ट मधून निसर्ग पहात झोपी जावे.

Pangong-Tso

सातवा दिवस – पॅंगॉन्ग त्सो ते लेह

सकाळी पॅंगॉन्ग लेक च्या आसपास पॅंगॉन्ग लेक मध्ये भरपूर फोटो काढून आरामात लेह गाठावे आणि आराम करावा.

आठवा आणि नववा दिवस – लेह – नुब्रा व्हॅली- लेह

लेह वरून लवकर  निघून तुम्ही नुब्रा व्हॅली साठी प्रयाण करावे. तेथील मोनेस्टरी , डबल हम्प उंट पाहावे,उंट सफारी करावी आणि शक्य झाल्यास तिथेच वस्ती करावी. पुढील दिवशी पुन्हा लेह कडे प्रयाण करावे आणि आराम करावा.

Leh Ladakh Tour Planning
Nubra-Valley

दहावा दिवस – लेह – श्रीनगर

आता लेह मधील मार्केट मध्ये हवे असल्यास काही खरेदी करून पुन्हा कारगिल मार्गे श्रीनगर गाठावे किंवा लेह मधून विमानाने मुंबई किंवा दिल्ली गाठावी

Leh Ladakh Tour Planning
Leh Airport

 

लेह टॅक्सी रेट्स २०२२-२०२३

तुम्हाला लेह मध्ये फिरायवयाचे असल्यास तेथून टॅक्सीकरता येईल. तुमच्या प्लॅन नुसार तिथे टॅक्सी मिळू शकते . दरवर्षी लेह टॅक्सी युनिअन आपले रेट्स ठरवत असते. २०२२-२०२३ चे रेट्स मी आपल्या साठी देत आहे. त्याचा वापर करून आपण लडाख मध्ये फिरण्याचा खर्च अंदाजे ठरवू शकता.

१० दिवसाची लेह लडाख टूर
Leh Taxi Union rates 2022-2023

2 thoughts on “१० दिवसाची लेह लडाख टूर चे प्लॅनिंग कसे करावे ?”

Leave a comment